आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parvez Rasool Refuses To Wear Jersey Who Show The Liquor Brand

परवेज रसूलचा मद्य कंपनीचा लोगो असलेल्‍या \'जर्सी\'स नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुणे वॉरियर्सचा गोलंदाज परवेज रसूलने मद्य कंपनीचा लोगो असलेला जर्सी घालण्‍यास नकार दिला आहे. उल्‍लेखनीय म्‍हणजे रसूलने ज्‍या कंपनीचा लोगो जर्सीवरून काढून टाकण्‍याची मागणी केली आहे. ती कंपनी आयपीएलची प्रायोजक आहे.

रसूल जम्‍मू काश्‍मीरकडून रणजी खेळतो. गुरूवारी कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्‍या सामन्‍यात पहिल्‍यांदाच त्‍याचा संघात समावेश करण्‍यात आला होता. त्‍याने आपल्‍या या निर्णयाची माहिती संघ व्‍यवस्‍थापनाला दिली आहे. जर्सीवर मद्य कंपनीचा लोगो लावल्‍याने आपल्‍या धार्मिक भावनांना ठेच पोहोचते. इस्‍लाम धर्मात मद्याला प्रतिबंध आहे. त्‍यामुळे माझा या जर्सीला विरोध आहे, असे त्‍याने म्‍हटले. पुणे वॉरियर्सनेही रसूलची विनंती मान्‍य केली. शनिवारी मुंबई इंडियन्‍सविरूद्धच्‍या सामन्‍यात त्‍याने तो लोगो लपवला होता.

यापूर्वीही दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमला यानेही मद्य कंपनीचा लोगो असलेला जर्सी घालण्‍यास नकार दिला होता. जेव्‍हा त्‍याच्‍या जर्सीवरून तो लोगो हटवण्‍यात आला. तेव्‍हाच त्‍याने संघात खेळणे सुरू केले होते.