Home | Sports | Other Sports | paul scholes retire for manchester united club

मँचेस्टर युनायटेडच्या शोल्सची निवृत्तीची घोषणा!

Agency | Update - Jun 01, 2011, 12:38 PM IST

गत दोन दशकांपासून फुटबॉल विश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण खेळीने यशाचे शिखर गाठणाऱ्या मँचेस्टर सिटी संघाचा मिडफिल्डर पॉल शोल्सने निवृत्तीची घोषणा केली.

 • paul scholes retire for manchester united club

  paulscholes_258मँचेस्टर - गत दोन दशकांपासून फुटबॉल विश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण खेळीने यशाचे शिखर गाठणाऱ्या मँचेस्टर सिटी संघाचा मिडफिल्डर पॉल शोल्सने निवृत्तीची घोषणा केली. बार्सिलोनाने मँचेस्टरला पराभवाचा धक्का दिल्यानंतर शोल्सने हा निर्णय घेतला. १९९४ मध्ये फुटबॉलच्या करिअरची शोल्सने सुरुवात केली. चेंडूवर ताबा मिळवण्याचे कसब असलेल्या शोल्सने दोन दशकांच्या कारकीर्दीत महत्त्वपूर्ण कामगिरी करत आतापर्यंत ६७६ फुटबॉल सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने १५ गोल केले आहेत.

  मँचेस्टर युनायटेड संघाकडून खेळत असलेल्या मिडफिल्डर पॉल शोल्सने १९९३ मध्ये पहिल्यांदा प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेला सुरुवात केली. १९९४ मध्ये सलग दुसऱ्या वर्षीही त्याने प्रीमियर लीगमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. या दोन्ही सामन्यांत त्याने उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन केले. त्यानंतर १९९६,९७ मध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेतही शोल्सची कामगिरी सरस ठरली. २९ ला शोल्सने शेवटचा प्रीमियर लीग सामना खेळला. यामध्ये त्याने १६ गोलची महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

  चॅम्पियन्स लीग
  १९९९ मध्ये मँचेस्टर संघाने पॉल शोल्सला चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्याची संधी दिली. प्रीमियर लीगपाठोपाठच चॅम्पियन्स लीगमध्येही त्याने चमकदार कामगिरी साधली. त्यानंतर तब्बल ९ वर्षांनंतर २८ ला पॉल शोल्स चॅम्पियन्स लीगमध्ये खेळला. दोनदा चॅम्पियन्स लीगमध्ये खेळलेल्या शोल्सची कामगिरी चांगली झाली.

  फुटबॉल असो. चॅम्पियन्स लीग
  मँचेस्टर युनायटेड संघाकडून खेळणाऱ्या शोल्सने १९९४ ला फुटबॉल असोसिएशनच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यानंतर त्याने १९९६, १९९९ व २४ मध्येही या स्पर्धेत सहभागी होऊन चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली होती.Trending