आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषकच्या आयोजनास पाक उत्सुक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची- आगामी 2018 मध्ये होणा-या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी पाकिस्तान उत्सुक आहे. या यजमानपदासाठी पाक आयसीसीची मनधरणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. मागील दहा वर्षांत आयसीसीची एकही स्पर्धा पाकमध्ये झाली नाही.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष झाका अशरफ यांनी नुकतीच विश्वचषक आयोजनाच्या अधिकृत बोली प्रक्रियेसाठी प्रवेशिका सादर केली आहे. पाकने 1996 मध्ये भारत व श्रीलंकेच्या संयुक्त विद्यमाने विश्वचषकाचे आयोजन केले होते. त्यानंतर पाकला अद्याप ही संधी मिळाली नाही. आयसीसीने 1996 पासून पाकिस्तानात मोठी स्पर्धा आयोजित न केल्याने पीसीबीचे प्रमुख अधिकारी सुभान अहमद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.