आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PCB Cricket Board Ex President Ijaz Butt Comment News In Marathi, Divyamarathi

पाकिस्तानचे एजाज बट्ट यांची बीसीसीआयवर विखारी टीका; म्हणाले \'सुअर की औलाद\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष एजाज बट्ट यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड या तिन्ही मंडळांवर विखारी टीका करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

बीसीसीआय, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड म्हणजे 'सुअर की औलाद' असल्याचे वक्तव्य एजाज बट्ट यांनी केले आहे. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वित्तसमिती, आर्थिक व्यवहार समिती आणि कार्यकारिणीत बीसीसीआय, इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया या तिन्ही मंडळांच्या प्रतिनिधींना मानाचे स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आयसीसीचा हा निर्णय एजाज बट्ट यांची जिव्हारी लागल्याने त्यांनी हे जळजळीत वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे. आयसीसीच्या या धोरणात्मक बदलांना एकट्या पीसीबीने विरोध केला आहे.

आयसीसीने केलेल्या नव्या बदलांबाबत, एजाज बट्ट यांना विचारले असता, बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ईसीबी हे तिन्ही क्रिकेट मंडळे 'सुअर की औलाद' असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, एजाज बट्ट यांनीची प्रतिक्रिया ऐकून क्रिकेट वर्तुळातील दिग्गजांच्या भुवया उंचावल्या आहेत. एजाज बट्ट यांची ही प्रतिक्रिया वैयक्तिक असल्याचे सांगून पीबीसीच्या अधिकार्‍यांनी मात्र दुरूनच अंग शेकले आहे.