आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेस, बोपन्नाची विजयी सलामी , डेव्हिस कपमध्ये भारताची सर्बियावर मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - भारताचाअनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस आिण रोहन बोपन्ना जोडीने पुरुष दुहेरीत सर्बियाच्या नेदार जिमोनजिक आिण इलिजा बोजोल्जिकला पराभूत करत विजयी सलामी दिली.

सर्बियाने पहिले दोन सेट ६-१, ७-६ ने जिंकले.
त्यानंतर सामन्यात जोरदार पुनरामगन करत भारताने ६-३, ६-३, ८-६ ने विजय मिळवला. यापूर्वी भारत आपल्या दोन्ही एकेरीचे सामने गमावल्याने अडचणीत आला होता. पहिल्या एकेरीत सर्बियाच्या डुसान लाजोविकने भारताच्या युकी भांबरीला सलग सेटमध्ये ६-३, ६-२, ७-५ ने मात पराभूत केले. दुसऱ्या लढतीत सोमदेव देवबर्मनने सर्बियाच्या फिलिप क्राजिनोविकला १-६, ६-४, ३-६, २-६ ने हरवले. आता रविवारी उलट एकेरीच्या लढतीला प्रारंभ होईल.