साओ पाओलो - सर्वकालीन महान फुटबॉलपटू म्हणून ज्यांचा गौरव गेला जातो, त्या पेले यांना ब्राझीलच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेले यांच्यावर मुतखड्याची शस्त्रक्रिया झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जाते. पेले यांना रुग्णालयात आणले त्या वेळी त्यांची तब्येत बरी नव्हती. औषधोपचार झाल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे अल्बर्ट आइन्स्टाइन रुग्णालयाने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे. सुरुवातीला पेले यांना युरिन इन्फेक्शन झाल्याचे काही स्थानिक वर्तमानपत्रांनी सांगितले होते. नंतर १३ नोव्हेंबर रोजी ७४ वर्षीय पेले यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.