आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल खेळाडूंचा लिलाव तीन फेब्रवारीला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल खेळाडूंचा लिलाव तीन फेब्रवारीला
मुंबई- आयपीएल खेळाडूंचा लिलाव तीन फेब्रवारी रोजी चेन्‍नई येथे आयोजित करण्‍यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या कार्यकारी समितीने मंगळवारी झालेल्‍या बैठकीत हा निर्णय घेतला. बैठकीत इतरही निर्णय घेण्‍यात आले. टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन संबंधित आदेशाबाबत उच्‍च न्‍यायालयाकडून स्‍पष्‍टीकरण मागण्‍यात येईल असेही निश्चित करण्‍यात आले. काही दिवसांपूर्वीच आंध्र उच्‍च न्‍यायालयाने मॅच फिक्सिंगप्रकरणी अझरूद्दीनवर घालण्‍यात आलेली आजीवन बंदी अवैध असल्‍याचा निकाल दिला होता.

सरकारी क्रीडा विभाग आणि राजस्‍थान क्रिकेट मंडळात सुरू असलेल्‍या वादामुळे जयपूरमध्‍ये होणारे आयपीएलचे सामने अहमदाबाद किंवा इतर ठिकाणी खेळवण्‍यावर विचार होऊ शकतो, असे बीसीसीआयच्‍या एका अधिका-याने सांगितले.