आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Personal Information Of Tennis Queen Maria Sharapova

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मार्टिनाच्‍या एका सल्‍ल्‍याने बदलले मारिया शारापोवाचे आयुष्‍य, वाचा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारिया शारापोवा अवघ्या सहा वर्षांची असताना तिने मॉस्कोमध्ये आयोजित एका टेनिस स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी टेनिस स्टार मार्टिना नोवरातिलोवाची नजर तिच्यावर पडली. मार्टिनाने शारापोवातील क्षमता अचूक हेरली आणि तिच्या वडिलांना मारियाला अमेरिकेतील फ्लोरिडामधील निक बोलेटेरीच्या प्रसिद्ध टेनिस अकॅडमीत पाठवावे, असा सल्ला दिला. मारियाचे वडील युरी यांनी मार्टिनचा सल्ला ऐकला, पण युरींना त्यावेळी ना इंग्रजी येत होती, ना पुरेसा पैसा जवळ होता. तरी अमेरिकेत मुलीला घेऊन ते दाखल झाले. मुलीच्या अकॅडमीचे पैसे भरण्यासाठी युरींनी लहान सहान कामे करण्यात कमीपणा मानला नाही. जास्त पैसे मिळवण्यासाठी त्यांनी अनेक वेळा हॉटेलात भांडी घासली. काबाडकष्ट करून त्यांनी मारियाला प्रतिष्ठित अकॅडमीत दाखल केले.

युरी पैसे कमावण्यासाठी कामात एवढे व्यग्र राहत की त्यांची मुलीसोबत भेट देखील होत नव्हती. स्वत: मारिया मान्य करते की एक वर्ष ती वडिलांना भेटू शकली नव्हती. आई रशियात राहत होती. तब्बल दोन वर्षांनंतर त्यांची भेट झाली. आई-वडिलांचा त्याग आणि कठोर परिश्रमाचे फळ म्हणजे आजची मारिया. ऑक्टोबर 2000 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी मारियाने पहिली मोठी स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर गेल्या 13 वर्षांत मारियाने मागे वळून पाहिलेले नाही. तिची घोडदौड आजही दिमाखात सुरू आहे. मारियाचे लव्‍ह लाईफ आणि तिच्‍या करिअरमधील महत्‍वाच्‍या घटनांबद्दल जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...