आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Perth Scorchers Vs Kolkata Knight Riders At Hyderabad In Clt20

CLT20: KKR चे विजयी अभियान सुरु, पर्थ स्कॉचर्सला 3 विकेटने नमवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद : कोलकाता नाइट रायडर्स विरुध्‍द पर्थ स्‍कोचर्स यांच्‍यामध्‍ये बुधवारी झालेल्‍याचॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या महत्त्वाच्या सामन्यात ‘अ’ गटात कोलकाताने 3 फलंदाज राखून विजय संपादीत केला.

ऑस्ट्रेलियाच्या पर्थ स्कोचर्स संघाच्‍या पराभवाबरोबरच केकेआरची विजयाची हॅट्रिक झाली आहे. केकेआरने विजयासाठी 152 धावांचे लक्ष्य गाठताना 15 व्‍या षटकांत 87 धावांत 5फलंदाज गमावले होते. परंतू सूर्यकुमार यादवने 19 चेंडूत चार षटकार आणि एका चौकारासह नाबाद 43 धावा करुन केकेआरच्‍या विजयावर शिक्कामोर्तब केले.

स्कोचर्सकडून अ‍ॅडम व्होजेसने नाबाद 71 क्रेग सिमन्सने 39 धावांची महत्वपूर्ण खेळी केली परंतु ते संघाला विजय मिळवून देण्‍यात अपयशी ठरले.

सुनील नरेन आणि कुलदीप यादवच्या जादुई फिरकीपाठोपाठ सूर्यकुमार यादवच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर केकेआरने हा विजय साकारला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यादरम्यानची छायाचित्रे...