आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Peterson Is A Battle Of; England's Six Veteran Fails

पीटरसनची एकाकी झुंज; इंग्लंडचे सहा दिग्गज अपयशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबोर्न - अ‍ॅशेस मालिकेत 0-3 ने पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडने चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी सहा बाद 226 धावांपर्यंत मजल मारली. केविन पीटरसन (नाबाद 67) वगळता इंग्लंडचे सहा दिग्गज फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन आणि रेयान हॅरिसने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, कांगारूंच्या धारदार गोलंदाजीसमोर कुकचा निर्णय सपशेल चुकीचा ठरला. कर्णधार कुकच्या (27) रूपाने इंग्लंडला पहिला जबर धक्का बसला. त्याला पीटर सीडलने मायकेल क्लार्ककरवी झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाने टी टाइमपर्यंत इंग्लंडच्या 135 धावसंख्येवर तीन गडी तंबूत पाठवले होते. कुकशिवाय कारबैरी (38) आणि ज्यो रुट (24) झटपट तंबूत परतले.
चाहत्यांचा नवा कसोटी विश्वविक्रम
ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीला गुरुवारी मेलबोर्न क्रिकेट मैदानावर सुरुवात झाली. कसोटीला पाहण्यासाठी तब्बल 91 हजार चाहते उपस्थित होते. कसोटीच्या इतिहासात हा एक विश्वविक्रम ठरला. पहिल्या दिवशी स्टेडियममध्ये 90,831 चाहते उपस्थित असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. यापूर्वी 1961 मध्ये याच मैदानावर बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्याच दिवशी 90,800 चाहत्यांची उपस्थिती नोंद आहे.
पीटरसनला मिळाले जीवदान
नॅथन कोल्टर नाइलने सीमारेषेवर पीटरसनची झेल घेतली. मात्र, सीमारेषेला नाइलच्या पायाचा स्पर्श झाल्याने पीटरसनला झेलबाद देण्यात आले नाही. अशा प्रकारे त्याला जीवदान मिळाले.
वॉटसनला दुखापत : सामन्याच्या 48 व्या षटकादरम्यान शेन वॉटसनला गोलंदाजी करताना दुखापत झाली. त्यामुळे लियोनने उर्वरित दोन चेंडू टाकून षटक पूर्ण केले. त्यामुळे आगामी चार दिवसांदरम्यान वॉटसनने खेळणे संदिग्ध आहे. त्याने गत तिसऑ या कसोटीत शानदार शतक झळकावले. बॉक्सिंग डे कसोटीतदेखील त्याने कारबैरीला त्रिफळाचीत आणि बेन स्ट्रोकची झेल घेतली.