आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Petra Kvitova And Eugenie Bouchard Reach Wimbledon Final

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विम्बल्डन : बुकार्ड-क्वितोवादरम्यान रंगणार अंतिम लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - चेक गणराज्यची टेनिसपटू पेत्रा क्वितोवा आणि कॅनडाची युजिनी बोकार्डने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानेही आपली विजयी मोहीम कायम ठेवत मिर्श दुहेरीच्या प्री-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताच्या रोहन बोपन्नाला मिर्श दुहेरीत अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला.

क्वितोवाने सफारोव्हाला हरवले : महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत क्वितोवाने तिच्याच देशाच्या ल्युसी सफारोव्हा हिचा 7-6, 6-1 असा पराभव केला. स्पध्रेत 13 वी मानांकित युजिनी बोकार्ड हिने तिसरी मानांकित रोमानियाची सिमोना हालेप हिचा 7-6, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली. क्वितोवा आणि बोकार्ड यांच्यादरम्यान अंतिम सामना खेळला जाईल.

स्टॅनिलास वावरिंका बाहेर : ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्टॅनिलास वावरिंकाला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चौथ्या मानांकित फेडररने 3-6, 7-6, 6-4, 6-4 ने पराभूत केले. या विजयाबरोबरच फेडरर स्पध्रेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

बोपन्नाचे स्वप्न भंगले
रोहन बोपन्ना व आंद्रेया हल्वाकोवा या सातव्या मानांकित जोडीला मिर्श दुहेरीच्या तिसर्‍या फेरीत एम. इल्गिन आणि ए. रोडिनोवाने 3-6, 7-5, 6-3 अशा फरकाने पराभूत केले.

सानिया-टेकाऊ विजयी
सहावी मानांकित जोडी सानिया मिर्झा-होरिया टेकाऊ यांनी मिर्श दुहेरीच्या दुसर्‍या फेरीत क्रोएशियाच्या एम. पेविक आणि सर्बियाच्या बी. जोवानावस्कीचा 6-3, 6-3 ने पराभव करत तिसरी फेरी गाठली.
(फोटो - पेत्रा क्वितोवा)