आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petra Kvitova Beats Eugenie Bouchard To Win Second Wimbledon Title

विम्बल्डन : पेत्रा क्वितोवा चॅम्पियन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - चेक गणराज्यची पेत्रा क्वितोवाने शनिवारी युजिनी बुकार्डला 6-3, 6-3 अशा फरकाने हरवत विम्बल्डन टेनिस स्पध्रेच्या महिला एकेरीच्या किताबावर आपले नाव कोरले. 24 वर्षीय क्वितोवाने दुसर्‍यांदा या स्पध्रेचे विजेतेपद मिळवले आहे. क्वितोवाने बुकार्डला केवळ 55 मिनिटांतच पराभूत करून विजेतेपदावर हक्क गाजवला. दुसरीकडे भारताचा लिएंडर पेस आणि चेक गणराज्यचा रादेक स्तेपानेकची फायनलमधील झुंज अपयशी ठरली. या अपयशासह या पाचव्या मानांकित जोडीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

ऑस्ट्रेलियाच्या बॉब व माइक ब्रायनने पुरुष दुहेरीच्या उपांत्य लढतीत फ्रान्सच्या एम.लोड्रा आणि एन. माहूतचा पराभव केला. अव्वल मानांकित जोडीने 7-6, 6-3, 6-2 अशा फरकाने विजय मिळवला.

पोस-सॉक विजयी
लिएंडर पेस आणि रादेक स्तेपानेकने उपांत्य लढतीत विजयासाठी शर्थीची झुंज दिली. या जोडीचा उपांत्य सामना बिगरमानंकित व्ही. पोसपिस्ली आणि जे. सॉक यांच्याशी झाला. या वेळी कॅनडा आणि अमेरिकेच्या या खेळाडूने उपांत्य लढतीत रोमहर्षक विजयाची नोंद केली. या बिगरमानांकित जोडीने 7-6, 6-3, 6-4 अशा फरकाने विजय मिळवला. या सामन्यातील पराभवामुळे पेस-स्तेपानेकला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

(फोटो - पेत्रा क्वितोवा)