आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेत्रा क्विताेव्हाला माद्रिद अाेपनचे विजेतेपद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला एकेरीच्या विजेतेपदासह चेक गणराज्यची पेत्रा व उपविजेतेपदासह रशियाची कुज्नेत्साेवा.
माद्रिद - चेक गणराज्यची पेत्रा क्विताेव्हा माद्रिद अाेपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटात चॅम्पियन ठरली. तिने रविवारी महिला एकेरीचा किताब पटकावला. चाैथ्या मानांकित पेत्राने अंतिम सामन्यात रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्साेवाला सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. तिने ६-१, ६-२ अशा फरकाने फायनलमध्ये शानदार विजय संपादन केला. यासह तिने विजेतेपदावर नाव काेरले. दुसरीकडे पराभवामुळे रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्साेवाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

माद्रिद अाेपनमधील अजिंक्यपदासह पेत्रा क्विताेव्हाने अागामी फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. येत्या २४ मेपासून फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेला प्रारंभ हाेत अाहे.

पेत्रा ठरली सामन्यात सरस
अंतिम सामन्यात कुज्नेत्साेवा व पेत्रा क्विताेव्हा यांनी ताेडीसताेड खेळी केली. जगातील नंबर वन सेरेनाला नमवल्याने पेत्राचा अात्मविश्वास द्विगुणित झाला. त्यामुळे तिने उपांत्य सामन्यातील विजयाची लय कायम ठेवत दमदार सुरुवात केली. तिने सरस खेळी करताना पहिल्या सेटमध्ये ६-१ ने सहज बाजी मारली. यासह तिने लढतीमध्ये अाघाडी घेतली. स्वेतलाना कुज्नेत्साेवाने पेत्राला राेखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला समाधानकारक खेळी करता अाली नाही.

नदाल-मरे फायनल रंगणार
स्पेनचा राफेल नदाल व इंग्लंडचा अँडी मरे यांच्यात पुरुष एकेरीची फायनल रंगणार अाहे नदालने उपांत्य सामन्यात टाॅमस बर्डिचचा ७-६, ६-१ ने पराभव केला.यासह त्याने अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे जपानच्या केई निशिकाेरीवर मात करून मरेने फायनलचे तिकीट मिळवले. त्याने ६-३, ६-४ ने उपांत्य सामना जिंकला.