आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petrolium Sports Promotion Board Presented Award To Saina, Gautam Gambhir

पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या वतीने सायना, गौतम गंभीर यांना पुरस्कार प्रदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरल्याचे 2009-10, 2011-12 या दोन वर्षांचे पुरस्कार सोमवारी एकत्रच प्रदान करण्यात आले. पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या (पीएसपीबी) वतीने विविध खेळातील खेळाडूंना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड, टेनिसपटू रोहन बोपन्ना, पंकज अडवाणी, पी.हरिकृष्ण, व्ही.आर.रघुनाथ यांनाही सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. यावेळी सायना, शरथ कमल, विराट कोहलीसह अनेक खेळाडू कार्यक्रमाला अनुपस्थित होते.

ज्वालाची जागतिक स्पध्रेतून माघार
राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या ज्वाला गुट्टाने वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली. तिने या वृत्ताला दुजोरा दिला. चीन येथे 5 ते 11 ऑगस्टदरम्यान, वर्ल्ड चॅम्पियनशिप रंगणार आहे. या स्पध्रेदरम्यान तिने व्ही. दिजुसोबत खेळण्यास नकार दिला.