आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Philip Hughes Record Centuries In Test Better Than Sachin, Bradman

FACTS: ब्रॅडमन आणि सचिनही नाही करु शकले ह्युजप्रमाणे विश्‍‍वविक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(फाइल फोटो : 8 मार्च 2009 ला शतक लगावताना फिलिप ह्यूज )

एका खतरनाक बाउंसरने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूजला क्रिकेटजगतातून कायमचे OUT केले आहे. ह्युज एवढा लोकप्रिय खेळाडू नव्‍हता तरीही त्‍याने केलेला विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सर डॉन ब्रॅडमनसुध्‍दा करु शकले नाहीत.
ह्यूजचा हा विक्रम केवह वयाच्‍या 20 व्‍या वर्षांतील आहे. एकाच कसोटीतील दोन्‍ही डावामध्‍ये त्‍याने शतके लगावली आहेत. असा विक्रम फक्‍त जगात दोनच फलंदाजांनी केला आहे. त्‍यापैकी ह्युज एक आहे.

डरबनमध्‍ये केला होता विश्‍वविक्रम

ह्यूजने 6 मार्च 2009 मध्‍ये डरबन येथे खेळल्‍या गेलेल्‍या कसोटीमध्‍ये दक्षिण आफ्रिकेविरुध्‍द एका कसोटीतील दोन डावात 115 आणि दुस-या डावात 160 धावा केल्‍या होत्‍या.
त्‍याच्‍या शतकाच्‍या जोरावर ऑस्ट्रेलियाने 546 धावांचा डोंगर उभा केला होता. ही कसोटी 175 धावांनी जिंकले होते.
8 मार्च 2009 रोजी ह्यूजने दूसरे शतक ठोकले, त्‍यावेळी त्‍याचे वय केवळ 20 वर्ष 97 दिवस होते. 21 वा वाढदिवस साजरा करण्‍यापूर्वीच त्‍याने हा कारनामा केला होता.

पुढील स्‍लाइडवर वाचा , एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकाचा विक्रमही ह्युजच्‍या नावे ...