(फोटो – शोकसभेत बोलताना क्लार्क।)
मॅक्सविले (न्यू साउथ वेल्स)- फिलिप ह्यूजला स्वत:च्या भावासमान लेखणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क संपूर्ण अंत्ययात्रेत रडताना दिसला. फिलिपला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी उभ्या असलेल्या क्लार्क बोलायला अडखळत होता. बोलतानाही तो हुंदके देत होता.
क्लार्कच्या श्रध्दांजलीपर भाषणातील काही अंश -
* फिलिपला
आपल्या गावावर फार गर्व होता. वयाच्या 25 वर्षीच तो आम्हाला सोडून गेला. परंतु त्याची छाप आमच्यावर कायम राहणार आहे.
* मला फिलिप सोडून जावूच शकत नाही. त्याचा आत्मा सदैव माझ्या सोबतच राहील.
* सिडनी क्रिकेट मैदानावर आम्हीसोबत कित्येक स्वप्न साकार केले. त्याच्यासोबतची प्रत्येक खेळी माझ्यासाठी संस्मरणीय राहणार आहे.
* ह्यूजचे चाहते आजही मैदानावरील त्याची खेळी आठवतील. क्रिडाप्रेमी त्याच्या खेळी पाहण्यासाठी नेहमी उत्सुक असत. त्याला प्रेरीत करत असत. फिलिपही चाहत्यांच्या दिशेने चेंडू टोलवून त्यांना खुश ठेवत असे.
* ज्याठिकाणी ह्यूज पडला होता. त्याठिकाणी जाताच ती जागा माझ्याशी बोलते. तेथे ह्युज माझ्याशी संवाद साधत होता. आम्ही कोणता शॉट खेळायला हवा, कोणता चित्रपट पाहायला हवा याविषयी सांगत होता.
* सिडनी क्रिकेट मैदानाव मला जाणवत होते की, प्रत्येक धावेसाठी ह्यूज मला इशारा करत होता.
* ऑस्ट्रेलियातील मुळ निवासी असे म्हणतात की, मनुष्याचा ज्या ठिकाणी अखेरचा श्वास घेतो त्याठिकाणी त्याचा आत्मा रेंगाळत असतो. हे जर खरे असेल तर सिडनी मैदानावर फिलिपचा आत्मा आहे. हे मैदान माझ्यासाठी पवित्र स्थळ राहणार आहे.
* ह्यूज नेहमी जगभरातील लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मृत्यूनेही सर्वांना जोडले आहे. कराचीमध्ये ह्यूजसाठी दीप प्रज्जवलित केला. तेंडुलकर, वार्न आणि लारा सारख्या महान खेळाडूंनी त्याला श्रध्दांजली वाहिली.
*माझ्या छोट्या भावा तू विश्रांती घे. मी तूला क्रिकेटच्या मैदानावर भेटेल.
पुढील स्लाइडवर वाचा, फिलिप ह्यूजच्या कौटूंबियांचे मत..