आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Phillip Hughes Tribute After Reaching 63 By David Warner

63 धावांवर केले ह्यूजचे स्मरण, शतक पूर्ण झाल्यानंतर वॉर्नरच्या डोळ्यात अश्रू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनीतील एससीजी मैदानावर सुरु असलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने भारताविरोधात चौथ्या कसोटीत 63 धावा धावा केल्या तेव्हा त्याला दिवंगत सहकारी फिलिप ह्यूजच्या आठवणी दाटून आल्या. वॉर्नरचे शतक पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले. त्याने टी-शर्टने डोळे पुसले. सिडनीतील याच एससीजी मैदानावर 25 नोव्हेंबर 2013 ला शेपील्ड शील्ड सामन्यात सलामीचा फलंदाज ह्यूजला बाउंसर लागल्याने तो गंभीर जखमी झाला आणि दोन दिवसानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

वॉर्नर आणि ह्यूज जीवलग मित्र होते. आजच्या भारताविरोधातील सामन्यात एससीजी मैदानावर वॉर्नरने 63 धावा केल्या तेव्हा त्याने दोन्ही हात उंचावून आपल्या जीवलग मित्राचे स्मरण केले आणि नंतर वाकून ज्या जागी ह्यूज कोसळला होता त्या जागेचे चुंबन घेतले. यावेळी वॉर्नरला भावना आवरणे कठीण झाले होते. वॉर्नरने वर्षाचे पहिले शतक आज पूर्ण केले. त्याने 114 चेंडूत झटपट 101 धावा केल्या.
अश्रूंना केली वाट मोकळी
वॉर्नरने मित्राचे स्मरण केले आणि त्याला मैदानावर वाकून श्रद्धांजली वाहिली तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. त्याच्या रुपाचे मैदानावरील प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले आणि वॉर्नरच्या माध्यमातून ह्यूजला श्रद्धांजली वाहिली.
सिडनीच्या एससीजी मैदानावर फिलिप ह्यूज 63 धावांवर खेळत असताना सीन एबॉटच्या गोलंदाजीवर जायबंदी झाला होता आणि नंतर त्याची प्राणज्योत मालवली. हा स्कोअर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसोबत भावनिकीरित्या जोडला गेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट रेकॉर्ड बुकमध्ये ह्यूज 63 धावांवर नाबाद असल्याचे नोंदवलेले आहे. या छोट्या घटनेतून ऑस्ट्रेलियाने खेळाडूंचा कसा सन्मान केला जावा हे दाखवून दिले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, डेव्हिड वॉर्नरची रोमांचक खेळी आणि काही भावनात्मक क्षण

फोटो - सीन एबॉट याचा चेंडू ह्यूजला लागल्यानतंर तो ज्या ठिकाणी कोसळला होता त्या जागेचे चुंबन घेऊन वॉर्नरने फिलिप ह्यूजला श्रद्धांजली वाहिली.