राष्ट्रकुल कीडांमध्ये पदक मिळवणा-या कुस्तीपटू बबीता आणि विनेश फोगट बहिणी एशियाड खेळामध्येही पदक पटकावतील अशी आशा आहे.
17 व्या एशियाड स्पर्धा इंचियोन(दक्षिण कोरिया) येथे 19 सप्टेंबरपासून होत आहेत.भारताचे यामध्ये 516 खेळाडू सहभागी होत आहेत. त्यामध्ये कुस्ती, शूटिंग, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि हॉकी खेळामध्ये भारताला पदकाची आशा आहे.
कुस्तीमध्ये भारताचे पारडे जड
2010 मध्ये झालेल्या एशियाड गेममध्ये भारताला कुस्तीत तीन कास्य पदक मिळाले होते. यावेळी भारताला 20 सुवर्णपदाकांची आशा आहे. भारताने एकूण 18 पहिलवांना या स्पर्धांमध्ये उतरविले आहे. त्यापैकी अमित, योगेश्वर, बजरंग, सत्यवर्त, पवन, बबिता, विनेश, गीतिका यांनी राष्ट्रकुलमध्ये पदक कमाविले आहे.
पुढील स्लाइडर पाहा, एशियाड खेळांमध्ये भारताचे प्रदर्शन