अहमदाबाद (गुजरात)- भारत आणि श्रीलंका दरम्यान होत असलेल्या एकदिसीय मालिकेतील दूसरा एकदिवसीय सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळल्या जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना 169 धावांनी जिंकलेला भारतीय संघ विजयी अभियान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नरत असेल.
संगकारा बनला ‘सुतार’
नेट प्रेक्टिस दरम्यान श्रीलंकेचा वरिष्ट खेळाडू कुमार संगकाराला बॅट पकडताना त्रास होत होता. बॅटची मूठ लांब असल्याने संगकाराने स्वत:च करवत घेवून बॅट कापण्याचा प्रयन्त केला. परंतु बॅटीची मुठ कापण्यात अयशस्वी ठरलेल्या संगकाराला सुताराची मदत घ्यावी लागली.
सामन्यावर कॅमे-यांची नजर
सरदार पटेल स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणावरुन गुजरात पोलिसांनी पार्किग, स्टेडियम, ट्राफिक, प्रवेशद्वार या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, सामन्यापूर्वीची रंजक छायाचित्रे...