भारताचा विजय आणि / भारताचा विजय आणि तिवारीच्‍या शतकाची पाहा काही खास क्षणचित्रे...

दिव्य मराठी वेब टीम

Dec 12,2011 03:35:54 PM IST

चेन्‍नई- टीम इंडियाने शेवटच्‍या सामन्‍यात वेस्‍ट इंडीजचा 34 धावांनी पराभव करून एकदिवसीय मालिका 4-1 ने जिंकली. नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी स्‍वीकारली. मनोज तिवारीचे पहिले शतक आणि विराट कोहलीच्‍या 18 व्‍या अर्धशतकाच्‍या जारोवर टीम इंडियाने 50 षटकात सहा गडयांच्‍या बदल्‍यात 267 धावा बनवल्‍या. उत्‍तरादाखल विंडीजचा 44.1 षटकात 233 धावांवर संपुष्‍टात आला. तिवारीने शानदार 104 धावा बनवल्‍या. जायबंदी झाल्‍यामुळे त्‍याला लवकरच तंबूत परतावे लागले. कोहलीने 80 धावा बनवल्‍या. वेस्‍ट इंडीजकडून पोलार्डने 119 धावा बनवलया.
टीम इंडियाचा पुनरागमन करणा-या इरफान पठाणने आपल्‍या पहिल्‍याच चेंडूवर एक गडी बाद करून विंडीजला धक्‍का दिला. दोन्‍ही देशांमध्‍ये खेळला गेलेला शेवटचा सामनादेखील कमालीचा अटीतटीचा झाला. फोटोंमधून पाहा या रोमांचक सामन्‍याची झलक...

X
COMMENT