आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: शानदार सांस्‍कृतिक कार्यक्रमाने अ‍ाशियाई अ‍ॅथलेटिक्‍स स्‍पर्धेची सांगता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भारताची वैविध्‍यपूर्ण सांस्‍कृतिक परंपरेचे दर्शन घडवतानाच या वैविध्‍यातील एकतेचे गोफ उलगडणा-या शानदार कार्यक्रमाने रविवारी विसाव्‍या अ‍ॅथलेटिक्‍स स्‍पर्धेचा समारोप झाला.

येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात गेली पाच दिवस सुरू असलेल्‍या स्‍पर्धेचा रविवारी सायंकाळी शानदार समारंभाने सांगता झाली. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्‍या प्रमुख उपस्थितीत झालेल्‍या या कार्यक्रमाला क्रीडा रसिकांचा उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी क्रीडामंत्री पद्माकर वळवी आणि क्रीडा राज्‍यमंत्री उदय सामंत, केंद्रीय क्रीडा सचिव प्रदीप देव उपस्थित होते.

सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्‍हणाले, अवघ्‍या काही दिवसांत या स्‍पर्धेची तयारी केल्‍याबद्दल मी क्रीडा विभागाचे मंत्री आणि अधिकारी यांचे कौतुक करतो. या स्‍पर्धेमुळे पुण्‍याची क्रीडानगरी शहर म्‍हणून ओळख आणखी ठळक होईल. येत्‍या 2014च्‍या आगामी स्‍पर्धेत देशातील खेळाडू निश्चित भरपूर पदकाचा पाऊस पाडतील अशी अपेक्षा व्‍यक्‍त करतो.

नकाशे सांस्‍कृतिक समूहाच्‍या कलाकारांनी सादर केलेल्‍या कार्यक्रमातून भारताच्‍या विविध राज्‍यातील सांस्‍कृतिक परंपरा सादर केल्‍या. त्‍यामध्‍ये राजस्‍थानी नृत्‍य, पंजाबी भांगडा, ओडिसी नृत्‍य, लावणी आदी नृत्‍यप्रकारांना उपस्थित श्रोत्‍यांनी दाद दिली. नेहा पेंडसे आणि पूजा सामंत यांच्‍या लावणी नृत्‍याला अवघ्‍या स्‍टेडियमने दाद दिली. राहूल सक्‍सेनाच्‍या गायनावरही ठेका धरला.

या कार्यक्रमास आशियाई अ‍ॅथलेटिक्‍स संघटनेचे सचिव मॉरिस निकोल्‍सन, भारतीय अ‍ॅथेलटिक्‍स संघटनेचे अध्‍यक्ष आदील सुमारीवाला, सचिव सी.के वाल्‍सन, सरचिटणीस प्रल्‍हाद सावंत, पुणे विभागाचे विभागीय आयुक्‍त प्रभाकर देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्‍त महेश पाठक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्‍त श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते. समारोपाची आणखी छायाचित्रे पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...