आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of Opening Ceremony Of Asian Athletics Competition In Pune

PHOTOS: रंगारंग सोहळ्यात आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे थाटात उद्‍घाटन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- डोळ्याचे पारणे फेडणारी आतषबाजी, रंगारंग कार्यक्रम आणि हजारो भारतीय चाहत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला थाटात प्रारंभ झाला. हवेत तिरंगी फुगे सोडल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास रंगलेल्या या सोहळ्यात धनगरी, आदिवासी, बिहू, गरबा नृत्याने रंगत आणली. बॉलिवूड नृत्याला प्रेक्षकांनी जल्लोषात दाद दिली, अप्रतिम अशा गणेशवंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला. सुमारे पाच हजार प्रेक्षकांनी हा कार्यक्रम याचि देही याचि डोळा अनुभवला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, क्रीडामंत्री पद्माकर वळवी, पुण्याच्या महापौर वैशाली बनकर, मोहिनी लांडे आदींची उपस्थिती होती. अधिक फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...