आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीने शेअर केले आपल्‍या पहिल्‍या बाईकचे फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाईकचा शौकिन असलेला टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पहिली बाईक कोणती होती, याची तुम्‍हाला कल्‍पना आहे काय ? धोनीची पहिली बाईक होती 'राजदूत'. धोनीने आपल्‍या या बाईकचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

आपल्‍या पहिल्‍या बाईकचे फोटो शेअर करताना धोनी लिहितो,'मी माझ्या पहिल्‍या बाईकचे स्‍पेअर पार्ट्स काल काढले होते. परंतु, नंतर ते कसे जोडतात याची मला माहिती नाही'.

धोनी सध्‍या क्रिकेटला ब्रेक देऊन आपल्‍या रांचीतील घरी विश्रांती घेत आहे. त्‍याने आपली ही पहिली बाईक अवघ्‍या 4500 रूपयांत खरेदी केली होती. आज धोनीजवळ अनेक सुपर बाईक्‍स आणि हमरसहित अनेक महागडया कार आहेत.

बाईकचा शौकिन असलेल्‍या धोनीकडे टू-व्‍हीलर रेसिंग टीमही आहे ज्‍याचे नाव माही रेसिंग टीम असे आहे. ही टीम वर्ल्‍ड सुपरबाईक चॅम्पियनशीपमध्‍ये भाग घेते.

धोनी या महिन्‍यात सुरू होणा-या चॅम्पियन्‍स लीग टी-20 सामन्‍यात चेन्‍नई सुपर किंग्‍जकडून खेळणार आहे. चेन्‍नई सुपरकिंग्‍जचे तीन सामने धोनीच्‍या रांचीमध्‍ये होणार आहेत. चॅम्पियन्‍स लीगचे आयोजन 17 सप्‍टेंबर ते सहा ऑक्‍टोबरपर्यंत होणार आहे. चेन्‍नई सुपरकिंग्‍जचा पहिला सामना 22 सप्‍टेंबर रोजी रांची येथे टायटन्‍सविरूद्ध होणार आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा धोनीच्‍या पहिल्‍या बाईकचे फोटो...