आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pitch For Sachin Tendulkars Last Test Match Ready

सचिनच्या ‘फेअरवेल सिरीज’साठी ईडन व वानखेडेची खेळपट्टी सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सचिन तेंडुलकरच्या भारत-वेस्ट इंडीज कसोटी मालिकेच्या ‘फेअरवेल सिरीज’साठी कॉर्पोरेट क्षेत्र, जाहिरात क्षेत्र आपापल्या परीने कल्पना राबवत असतानाच कोलकाता व मुंबई येथील कसोटी केंद्र आपापल्या खेळपट्ट्या तयार करण्यात मग्न झाले आहे. बीसीसीआयच्या पीच कमिटीचे प्रमुख दलजितसिंग गेले तीन दिवस मुंबईत मुक्काम ठोकून होते. त्यांनी वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीची पाहणी केली. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी तयार करणारे सुधीर नाईक यांच्याशी सचिनच्या 200व्या कसोटीसाठी कशी खेळपट्टी असावी, यासंदर्भात चर्चाही केली. पावसाळ्यानंतर वानखेडे स्टेडियमवर होणारा पहिला क्रिकेट सामना सचिन तेंडुलकरचा 200वा कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे खेळपट्टीचे स्वरूप कसे असेल, याबाबत सर्वजण अनभिज्ञ आहेत.

‘नेहमीप्रमाणे स्पोर्टिंग विकेट तयार करणार आहोत, ज्या खेळपट्टीवर गोलंदाज व फलंदाजांना समान संधी मिळेल. पावसाळा नुकताच सरल्याने मैदान हिरवेगार आहे. या खेळपट्टीवर चेंडूला उत्तम उसळी मिळते. सुरुवातीला या खेळपट्टीवर चेंडू स्विंग होतो. नंतर खेळपट्टी फिरकी गोलंदाजीस सहायक ठरायला लागते. सचिन आपल्या अखेरच्या कसोटीत या खेळपट्टीवर मोठी खेळी करील, असे सुधीर नाईक म्हणाले.

हवामान खात्याचा कौल
कोलकाता येथे गेल्या आठवड्यात सतत पाऊस पडत होता. हवामान खात्याचा अंदाज चांगला असल्यामुळे येत्या पाच दिवसांत खेळपट्टी चांगली रोल करून कसोटीसाठी सज्ज होईल, असा विश्वास प्रबीर मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे.