आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोर्टमंडचा पियरे एमेरिक बोल्टपेक्षाही अधिक वेगवान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जगातील सर्वात वेगवान धावपटू युसेन बोल्टपेक्षा अधिक सुपरफास्ट खेळाडू आहे, हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र, हे सत्य आहे. गेबोन आणि जर्मनी फुटबॉल क्लब बोरसिया डोर्टमंडचा फॉरवर्ड पियरे एमेरिक औबामेयांग 30 मीटरपर्यंत विश्वविक्रमवीर बोल्टपेक्षाही अधिक वेगाने धावतो. 100 मीटर धावण्याची शर्यत 9.58 सेकंदात पूर्ण करून विश्वविक्रम आपल्या नावे करणारा आणि सलग दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन युसेन बोल्ट 30 मीटरपर्यंत धावण्यात मागे पडतो.


फुटबॉलपटू पियरेने मागील आठवड्यात झालेल्या चॅम्पियन्स लीग फायनलिस्टसोबत सरावादरम्यान, 30 मीटरचे अंतर 3.70 सेकंदांत पूर्ण केले. त्याने बोल्टपेक्षा अधिक सरस कामगिरी करून दाखवली. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीदरम्यान, जमैकाच्या बोल्टने 30 मीटरचे अंतर 3.78 सेकंदांत गाठले होते.


धावण्यामध्येच पियरे अधिक सरस आहे असे नाही, तर त्याने आतापर्यंत 41 गोल केले आहेत. या फुटबॉलपटूला डोर्टमंडने दोन कोटी दहा लाख डॉलरला खरेदी केले आहे. सहा ऑलिम्पिक किताब विजेता वोल्ट सध्या पुढच्या महिन्यात मॉस्कोत होणा-या वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत आहे. त्याने 2009 मध्ये या स्पर्धेत 100 मीटरच्या शर्यतीत 9.58 सेकंदाचा विक्रम नोंदवला होता. मात्र, 2011 मध्ये स्पर्धेदरम्यान, फॉल्स स्टार्टमुळे त्याला फायनलमधून बाहेर पडावे लागले होते.


3.70 सेकंदात 30 मीटर धावतो पियरे
3.78 सेकंदांत 30 मीटर धावतो बोल्ट