आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PL 8: Preview Of Match Between Chennai Super Kings V Kolkata Knight Riders

IPL: गंभीर-धाेनी अाज झुंजणार! काेलकाता विजयासाठी सज्ज!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता - जबरदस्त फाॅर्मात असलेला कर्णधार महेंद्रसिंग धाेनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ अाठव्या सत्राच्या अायपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत सातव्या विजयासाठी सज्ज झाला अाहे. स्पर्धेत गुरुवारी पुन्हा एकदा धाेनी िब्रगेड अाणि गाैतम गंभीरचा काेलकाता नाइट रायडर्स संघ झुंजणार अाहेत. सहाव्या विजयासह चेन्नई संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले अाहे. त्यामुळे अाता गुणतालिकेतील हे स्थान अधिक मजबूत करण्याचा दाेन वेळच्या चेन्नई सुपरकिंग्जचा प्रयत्न असेल.

चेन्नई संघाने अापली लय कायम ठेवत सहाव्या विजयाची नाेंद केली. यात मॅक्लुमसह डॅवेन स्मिथचे याेगदान माेलाचे ठरले. गाेलंदाजीत डॅवेन ब्राव्हाे अाणि अार. अश्विन यांनीदेखील महत्त्वाची भूमिका बजावली. अाशिष नेहरानेही शानदार गाेलंदाजी केली अाहे. त्यामुळे अापल्या शानदार फलंदाजी अाणि गाेलंदाजीच्या बळावर पुन्हा एकदा काेलकाता संघाला पराभवाची धूळ चारण्यासाठी चेन्नईचे सुपरकिंग्ज उत्सुक अाहेत.
गंभीरकडून अाशा
यजमान काेलकाता संघाला अाता कर्णधार गाैतमकडून गंभीर खेळीची अाशा अाहे. त्याला गत सामन्यात भाेपळाही फाेडता अाला नाही. त्यामुळे हे अपयश दूर सारून गाैतम संघासाठी माेठी खेळी करेल, असे टीमला वाटत अाहे. युसूफ पठाण, राॅबिन उथप्पा अाणि मनीष पांडेदेखील अद्याप अापल्या धडाकेबाज फलंदाजीची छाप पाडू शकले नाहीत.
अव्वल स्थान कायम ठेवणार सलगच्या विजयासह चेन्नई सुपरकिंग्ज संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले अाहे. अाता हे स्थान कायम ठेवण्याचा धाेनी ब्रिगेडचा प्रयत्न असेल. त्यासाठी विजयाकडे चेन्नईचे लक्ष लागले अाहे.

अाता नक्की जिंकू ! कदाचित असे तर केकेअारचा कर्णधार गाैतम गंभीर हस्तांदाेलन करताना चेन्नईच्या धाेनीला म्हणत नसेल ना? कारण गत सामन्यात चेन्नई संघाने काेलकात्याचा पराभव केला हाेता.