आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PL Spot Fixing: Jagmohan Dalmiya Promises To Clean Up Cricket

आयपीएलमध्‍ये आता दिसणार नाही चिअर लीडर्स, नाईट पार्टीवरही येणार गदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) हंगामी प्रमूख बनलेले जगमोहन दालमिया यांनी आयपीएलमध्‍ये चीअर लीडर्स आणि नाईट पार्टीला प्रतिबंध करण्‍याचा प्रयत्‍न करणार असल्‍याचे म्‍हटले आहे. स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत आयपीएल आयोजनाच्‍याही ते विरोधात आहेत. एक वर्ष आयपीएलचे आयोजन न करता क्रिकेटमधील घाण दूर करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात यावे असे त्‍यांना वाटते.

भारतीय क्रिकेटला विश्‍वासहर्ता मिळवून देणे ही आपली सर्वोच्‍च प्राथमिकता असल्‍याचे त्‍यांनी पत्रकार परिषदेत म्‍हटले. सध्‍या आयपीएलमधील स्‍पॉट फिक्सिंगप्रकरणामुळे भारतीय क्रिकेटच्‍या प्रतिमेला जो धक्‍का पोहोचला आहे. त्‍यातून कसे सावरता येईल, याला आपले प्राधान्‍य असेल, असे त्‍यांनी म्‍हटले. ते म्‍हणाले, माझी नियुक्‍ती म्‍हणजे मी निर्दोष असल्‍याचे सिद्ध होते. माझ्यावर जे आरोप लावण्‍यात आले होते, त्‍यातून मी यशस्‍वीपणे बाहेर पडलो आहे.

बीसीसीआयच्‍या पदाचा राजीनामा दिलेले संजय जगदाळे आणि खजिनदार अजय शिर्के यांनी राजीनामा मागे घ्‍यावा, अशी विनंतीही आपण केल्‍याचे दालमिया यांनी म्‍हटले. हंगामी अध्‍यक्षपद मिळणे म्‍हणजे माझा वैयक्तिक विजय नसून उलट क्रिकेटची प्रतिमा सुधारण्‍याची मला संधी मिळाली अल्‍याचे त्‍यांनी सांगितले.