आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्येयावर ‘लक्ष’ ठेवून खेळा - नेमबाज अंजली भागवत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आमच्यासारखे खेळाडू अपु-या सुविधा असतानाही केवळ मेहनतीच्या जोरावर पुढे आले आहेत. त्यामुळे मेहनत करत राहा. ध्येय समोर ठेवून देशासाठी खेळले तरच मोठे यश मिळते, असे मत आंतरराष्‍ट्रीय नेमबाज अंजली भागवतने व्यक्त केले


ती शूटिंग रेंजच्या उद्घाटनप्रसंगी औरंगाबादला आली होती. त्या वेळी तिने पत्रकारांशी संवाद साधला.
नवोदित नेमबाजांसाठी सध्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत आहेत. यामुळे भविष्यात देशात उत्कृष्ट आंतरराष्‍ट्रीय नेमबाज तयार होतील. या सुविधांचा फायदा नेमबाजांनी घ्यायला हवा. तेव्हाच खेळाडूंचा दर्जा उंचावेल असे अंजली म्हणाली.


ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रीत करणार
मी स्वत: नेमबाजीची प्रोफेशनल इव्हेंटसाठी तयारी करीत आहे. सध्या स्वत:चा सराव आणि प्रबोधिनीमध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे. येत्या ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करत आहे. औरंगाबादमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. येथील नेमबाजांना मार्गदर्शन करण्याची माझी तयारी असून येथे येण्यास मी नेहमी उत्सुक आहे.