आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेलोगे, कूदोगे तो बनोगे डबल नवाब : धनराज पिल्ले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पढोगे, लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे, कूदोगे तो बनोगे खराब’ एकेकाळी लोक असे म्हणायचे. आता मात्र जमाना बदलला आहे. आताचे हेच वाक्य असेल ‘पढोगे, लिखोगे ते बनोगे नवाब, खेलोगे, कूदोगे तो बनोगे डबल नवाब.’ आता काळ खरोखरच बदलला आहे. फक्त क्रिकेट या खेळातच नव्हे, तर अन्य खेळातही पैसा आला आहे. इतर खेळ आणि खेळाडूंनाही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. हे सुचिन्ह आहे. प्रत्येक राज्याचे, देशाचे खेळाच्या खर्चाचे अंदाजपत्रक वाढतेय. सर्व राज्यांमध्ये क्रीडा प्रशिक्षणाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा होत आहेत. भारतात अनेक खेळांसाठी परदेशी तज्ज्ञ शिक्षकांना पाचारण केले जात आहे. हे बदल स्वागतार्ह आहेत. माझे हॉकीचे आणि खेळाचे दैवत ध्यानचंद. भारताचे माजी ऑलिम्पियन, बर्लिन ऑलिम्पिकचे हीरो, हॉकीचे जादूगार ध्यानचंद. आज या महान क्रीडापटूचा जन्म दिवस. देशात आजचा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होत आहे. आजच्या या शुभदिनी देशातील सर्वोत्तम क्रीडा पुरस्कारांची, अर्जुन, राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य, ध्यानचंद आदी क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्याची परंपरा आहे.


अधिक माहितीसाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....