आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Player Reports Fixing Approach In Indian Premier League

आयपीएल-8मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न, एका खेळाडूने केला खुलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आयपीएल-८ मध्येही फिक्सिंगचा प्रयत्न करण्यात आला. सध्या राजस्थान रॉयल संघाकडून खेळत असलेल्या मुंबईच्या एका खेळाडूने हा खुलासा केला आहे. रणजी ट्रॉफीच्या दरम्यान संघातील एका सहकार्‍याने आपल्याला फिक्सिंगची ऑफर दिली होती, असा दावा या खेळाडूने केला आहे.

या खेळाडूने त्वरित या प्रकाराची माहिती बीसीसीआयच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक युनिटला दिली होती. सीईओ रघू अय्यर यांनी या घटनेला पुष्टी दिली आहे. ज्या खेळाडूने फिक्सिंगची ऑफर दिली होती तो सध्या आयपीएलच्या कुठल्याही संघात नाही. आयपीएल-६ मध्ये फिक्सिंग केल्याच्या आरोपावरून आरआरच्या तीन खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे.

जागरूकतेमुळे मंडळ खुश
आमचे खेळाडू जागरूक झाल्यामुळे मी खुश आहे. काय करायचे आहे याची माहिती त्यांना आहे. - अनुराग ठाकूर, बीसीसीआयचे सचिव