आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मैदान जिंकणार्‍या शूरवीरांचे औरंगाबादेत भव्य स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा महिला संघ औरंगाबादेत परतला त्या वेळी साईचे अधिकारी आणि जिल्हा धनुर्विद्या संघटनेतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी साईचे सी. एल. कुर्मी, राष्ट्रीय प्रशिक्षक रवी शंकर, अजितसिंग राठोड, जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मीकांत खिच्ची, सहसचिव भीमराज रहाणे, अशोक जंगमे, एमटीडीसीचे चंद्रशेखर जैस्वाल यांची उपस्थिती होती. ऑलिम्पियन दीपिकाकुमारी, एल. बोम्बल्या देवी, रिमिल बुरुली यांच्यासह डोला बॅनजी, तरुणदीप रॉय, संदीपसिंग, जयंत तालुकदार हे खेळाडू मंगळवारी परतले.

पॅरिसच्या स्पध्रेत पदकाचे लक्ष्य : दीपिका आगामी पॅरिस येथे होणार्‍या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ऑलिम्पिकपटू दीपिकाकुमारी म्हणाली. गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्म सुरू असल्याने अपेक्षेप्रमाणे माझ्याकडून कामगिरी झाली नाही. आता मी वैयक्तिक कामगिरीवर अधिक लक्ष देणार आहे. पुढच्या महिन्यात टोकियो येथे होणार्‍या रॅकिंग स्पध्रेसाठी निवड चाचणी असून त्यातही चांगली कामगिरी करण्यावर माझा भर राहील. पोलंडमध्ये अव्वल संघ कोरियाला पराभूत करून सुवर्णपदक पटकावल्याने आनंदित आहे. त्यांना पराभूत करणे अवघड होते. अखेरच्या फेरीत अचूक लक्ष भेदत आम्ही बाजी मारली, असे दिपिका म्हणाली.
4कोरियाला वर्ल्डकपमध्ये सलग दुसर्‍यांदा पराभूत करून सुवर्णपदक जिंकल्याचा जल्लोष करणार आहोत. अशीच विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. आमचा संघ एकजूट होता. एकमेकींच्या कामगिरीकडेही आमचे लक्ष होते. आम्ही एकमेकींचा विश्वास वाढवत होतो. - बोम्बल्या देवी, महिला तिरंदाज.
अंकितकडे भारतीय संघात जाण्याची क्षमता आणि संधी या दोन्ही आहेत. त्याला सातत्यपूर्ण कामगिरी आवश्यक आहे. अष्टपैलू कामगिरी त्याच्यासाठी फायद्याची ठरेल. त्याने वेगवान गोलंदाजांविरुद्ध जास्तीत जास्त खेळायला हवे. - सुरेंद्र भावे.