आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खानच्या प्रकृती सुधारणेकरिता खेळाडू करत आहेत प्रार्थना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इम्रान खान निवडणुकीच्या एका रॅलीत जखमी झाल्याचे वृत्त जगभर पसरल्यानंतर संपूर्ण क्रिकेट जगतातून त्याच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थना होत आहे. दरम्यान, इम्रानची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि माजी खेळाडू इंझमाम-उल-हक यांनी रुग्णालयात जाऊन इम्रानच्या प्रकृतीची माहिती घेतली. मंगळवारी रॅलीदरम्यान पडल्यामुळे इम्रानच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. इम्रानच्या डोक्याला झालेल्या जखमा गंभीर असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या डोक्याला बरेच टाके देण्यात आले आहेत.


इम्रानची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आफ्रिदी म्हणाला, इम्रान पूर्वी जितके विनम्र होते, तितकेच ते आजही आहेत. त्यांची प्रकृती लवकर सुधारेल, अशी मला आशा आहे.’