आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Players Shying As Condom Ads On Kings XI Punjab\'s Jersey In IPL 8

IPL 8: प्रीती झिंटाच्या टीम जर्सीवर नवी जाहिरात, खेळाडूंना वाटतेय लज्जास्पद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल सुरु होऊन दोनच दिवस झाले नाही तर, टीमचे मजेदार किस्से रंगू लागले आहेत. डेव्हिड मिलर, मनन व्होरा, ग्लेन मॅक्सवेल यासारखे खेळाडू असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबची टीम पहिला सामना खेळण्याआधीच नर्व्हस आहे. सलामीच्या सामन्याचे त्यांच्यावर दडपण नाही तर, त्यांच्या नर्व्हसनेसचे कारण त्यांची जर्सी आहे. पंजाब टीमच्या जर्सीवर कंडोमची जाहीरात देण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू ओशाळले आहेत.बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा को-ओनर असलेल्या पंजाबचा पहिला सामना 10 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे.
जर्सीवर कंडोमची जाहिरात
आयपीएल फ्रँचायझी टीम पंजाबला शेवटच्या क्षणी स्पॉन्सरशिप डील बदलावी लागली आणि मॅनफोर्स कंपनीसोबत त्यांची डील फायनल झाली. आता पंजाब खेळाडूंच्या जर्सीवर या कंपनीची जाहिरात झळकणार आहे. त्यामुळे टीम सदस्यांना थोडे लज्जास्पद वाटत आहे. टीमचे को-ओनर मोहित बर्मन म्हणाले, 'कंपनी त्यांची जाहिरात जर्सीच्या मागे देणार आहे. तिथे दुसरे प्राइम स्पॉन्सर टाटाची देखील जाहिरात असणार आहे.'
आयपीएलमधील पहिले प्रकरण
आयपीएलमध्ये असा काही नियम नाही की कॉन्ट्रासेप्टिव्ह फर्म्स स्पॉन्सर असू शकत नाही. मात्र गेल्या सात सीजनमध्ये असे एकही प्रकरण समोर आलेले नाही, हे देखील खरे आहे. आयपीएलमध्ये ही पहिली वेळ आहे, जेव्हा एखाद्या टीमच्या जर्सीवर कॉन्ट्रासेफ्टीव्ह फर्मची जाहीरात असेल. याबद्दल आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला म्हणाले, 'अशा जाहिराती आपण टीव्हीवर तर पाहातोच, पण आमच्याकडे असे काही नियम नाही की आयपीएलमध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह फर्म्स स्पॉन्सर असू शकणार नाही.'
याबद्दल जाहिरात देणार्‍या कंपनीने म्हटले आहे, आयपीएलमध्ये आमचा टार्गेट ग्रूप पुरुष प्रेक्षक आहे, तेच मोठ्या संख्येने सामने पाहातात. या जाहिरातीने टीमची लोकप्रियता वाढेल आणि बँक बॅलेंन्स देखील.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, टीम पंजाबची नवी जर्सी