आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Playing With Warner Is Good Experience Says Unmukat Chand

डेव्हिड वॉर्नरकडून शिकण्यासारखे : उन्मुक्त चंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध मी डेव्हिड वॉर्नरच्या फलंदाजीचा आनंद लुटला. त्याच्यासारख्या फलंदाजाची फलंदाजी पाहण्यातही माझ्यासारख्या युवा खेळाडूला शिकायला मिळते, अशी प्रतिक्रिया दिल्ली डेअरडेव्हिल्सचा युवा फलंदाज आणि भारताच्या 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंदने व्यक्त केली.

मी वॉर्नरसोबत फलंदाजी करून चांगला अनुभव घेतला आहे. त्याच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. डावाला कशी सुरुवात करायची आणि पुढे ती खेळी कशी फुलवायची, हे मला त्याच्याकडून समजले. फलंदाजीच्या वेळी तो खूप कमी जोखीम घेऊनही आक्रमक खेळी करतो. हा गुण त्याच्याकडून शिकण्यासारखा आहे, असेही त्याने नमूद केले.