आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi And Sports Minister Felicitates Medalists

पंतप्रधान मोदी यांनी केला आशियाई खेळातील पदक विजेत्‍या खेळाडूंचा गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोनमध्‍ये आयोजित 17 व्‍या आशियाई खेळांमध्‍ये भारताच्‍या पदक विजेत्‍या खेळाडूंचा भारतीय क्रीडा मंत्रालयाने सोमवारी गौरव केला. या विशेष कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
खेळाडूंना संबोधीत करताना पंतप्रधान मोदी म्‍हणाले, की ‘’खेळाप्रती माझी असलेली आस्‍था आणि सर्व खेळाडूंच्‍या हिम्‍मतीच्‍या बळावर आपण देशाचा विकास करु’’.
क्रीडापटूंच्‍या गौरवाच्‍या कार्यक्रमामध्‍ये क्रीडामंत्री सरबानंदा सोनोवाल म्‍हणाल्‍या की, राष्‍ट्रकुलमध्‍ये पदक विजेत्‍या खेळाडूंचा गौरव केल्‍यानंतर आशियाई स्‍पर्धेतील पदक विजेत्‍यांचा गौरव करण्‍याचे भाग्‍य मला लाभले. त्‍यामुळे मी खुप आनंदी आहे. सर्व पदक विजेत्‍या खेळाडूंनी 2016 मध्‍ये होणा-या रियो ऑलिम्पिकमध्‍ये सर्वश्रेष्‍ठ प्रदर्शन करून देशाची मान उंचवावी.

आशियाई स्‍पर्धेत भारताने 11 सुवर्ण, 10 रौप्‍य आणि 36 कांस्य पदकासह एकूण 57 पदकांची कमाई केली आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, गौरवसमारंभातील छायाचित्रे...