आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Inaugurates ICC World Cup Trophy 2015

PM नरेंद्र मोदींनी दिली ICC विश्‍व चषकास भेट, घेतला SELFIE

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर मोदी आणि टोनी एबॉट सेल्‍फी फोटो घेताना)
मेलबर्न- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्‍या ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर आहेत. मोदींनी मेलबर्न क्रिकेट मैदानावर आयसीसी विश्‍व चषक 2015 च्‍या चषकाला भेट दिली. यावेळी मोदींसोबत दोन्‍ही देशांचे दिग्‍गज क्रीडापटू आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांची उपस्थिती होती.
भारतीय पंतप्रधान मोदी यांनी अॅबॉटसोबत सेल्फी घेतला आणि आपल्‍या ट्विटर अकाउंटवर पोस्‍ट केला.
विश्‍व चषक प्रदर्शन कार्यक्रमामध्‍ये नरेंद्र मोदी आणि टोनी अॅबॉट शिवाय सुनील गावसकर, कपिल देव आणि व्‍ही.व्‍ही.एस लक्ष्मण या भारतीय क्रीडापटूंची उपस्थिती होती. तसेच ऑस्ट्रेलियाचे दिग्‍गज अॅलन बॉर्डर, ग्लेन मॅक्ग्राथ, मायकल कॅस्प्रोविच आणि डीन जोन्स उपथित होते.
मोदींनी भेट दिला चरखा
पंतप्रधान मोदींनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला गांधीजींचा चरखा भेट दिला. या चरख्‍यावर सुनील गावसकर, कपिल देव, व्‍ही.व्‍ही.एस लक्ष्मण आणि मोदींच्‍या ऑटोग्राफ असलेली तीन चेंडू ठेवण्‍यात आली होती.
पुढील स्‍लाइडवर पाहा, विश्‍वचषकासह पंतप्रधान मोदी...