आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pointing Mike Hussy Wants In Team Says Dean Jones

पाँटिंग, हसी संघात हवे होते : डीन जोन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ऑस्ट्रेलियाच्या सुमार कामगिरीमुळे त्यांचा माजी खेळाडू डीन जोन्स चांगलाच दु:खी झाला आहे. रिकी पाँटिंग आणि मायकेल हसी या दोन अनुभवी खेळाडूंची संघाला उणीव जाणवत असल्याचे डीन जोन्सने म्हटले.

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जोन्स म्हणाला, ‘पाँटिंग आणि हसीची अनुपस्थिती मधल्या फळीत स्पष्टपणे दिसून येत आहे. कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करावी, यामुळे क्लार्क द्विधा मन:स्थितीत सापडला आहे. आता त्याला चौथ्या क्रमांकाचा विचार करावा लागेल.’ हसी महान खेळाडू होता. दुर्दैवाने आता संघात भारतीय फिरकीपटूंचा सर्मथपणे सामना करू शकेल असा त्याच्यासारखा एकही खेळाडू नाही, असेही जोन्स म्हणाला.