आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Keep Well Security For India Australia T 20 Matches

भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांची जय्यत तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - येथील खांदेरीच्या मैदानावर गुरुवारी होणा-या भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्याच्या सुरक्षेसाठी सौराष्‍ट्र क्रिकेट असोसिएशन आणि राजकोट ग्रामीण पोलिसांनी पुरेशी जय्यत तयारी करून ठेवली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मंगळवारीही कसून सरावाला प्राधान्य दिले.


राजकोटचे ग्रामीण पोलिस अधीक्षक विशालकुमार वाघेला यांनी 19 उपअधीक्षकांसह एक हजार पोलिस कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच तब्बल 52 सीसीटीव्ही कॅमेरे प्रेक्षक स्टँडमध्ये बसवण्यात आले असून त्याद्वारेदेखील काटेकोर नजर ठेवण्यात आली आहे. या सामन्यासाठी तब्बल 6.5 कोटी रुपयांचा विमादेखील उतरवण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली असल्याचेही हिमांशू शहा यांनी सांगितले.


डेव्हिड वॉर्नर पुन्हा अडचणीत
ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका स्थानिक सामन्यात खेळणे अपेक्षित असताना तो नेटमध्ये सराव करत बसल्याने न्यू साऊथ वेल्स क्रिकेट असोसिएशनने त्याच्यावर पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. रँडवीक पीटरशॅम क्लबच्या सामन्यात खेळणे आवश्यक असताना तो नेटमध्ये सराव करीत बसला होता. एका सूत्रानुसार तर तो घोड्यांच्या शर्यतीसाठी गेला होता. मात्र त्याला भक्कम पुरावा नाही. या सर्व प्रकारांमुळे न्यू साऊथ वेल्स क्रिकेट असोसिएशनने वॉर्नरवर भविष्यातील एका एकदिवसीय सामन्यावर तसेच शेफील्ड शील्डमधील सामन्यांमध्ये खेळण्यावर बंदी घातली आहे.