आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिक्षेत्र पोलिस क्रीडा स्पर्धा : व्हॉलीबॉल, फुटबॉलमध्ये औरंगाबाद अंतिम फेरीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - येथे सुरू असलेल्या औरंगाबाद परिक्षेत्र पोलिस क्रीडा स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी विविध स्पर्धांत वर्चस्व राखले आहे. मंगळवारी झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये औरंगाबाद संघाने बीड संघाला सलग दोन सेटमध्ये नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसºया उपांत्य सामन्यात उस्मानाबादने जालन्याला 2-0 ने पराभूत केले. व्हॉलीबॉलच्या अंतिम फेरीत औरंगाबादसमोर उस्मानाबादचे आव्हान असेल. तसेच फुटबॉल सामन्यात जिल्ह्याच्या संघाने बीडवर 2-0 ने मात करत अंतिम फेरी गाठली.
गोकु ळ स्टेडियमवर व्हॉलीबॉलच्या उपांत्य सामन्यात औरंगाबादने बीडवर 2-0ने मात केली. यात आघाडीचे आसिफ शेख, विक्रम जाधव, नुजरत शेख, गोपाल सोनवणे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. बीडतर्फे शेख बाबर व राहुल डिक्कतने एकाकी लढत दिली. औरंगाबादने 25-13, 25-17 गुणफरकाने बाजी मारली. दुसºया सामन्यात उस्मानाबादने जालन्याला 2-0 ने
पराभूत केले. यात औदुंबर काकड आणि शिवाने शानदार खेळ केला. फुटबॉलच्या उपांत्य सामन्यात औरंगाबाद संघाने बीडवर 2-0 ने विजय मिळवला. यात आघाडीचा स्ट्रायकर अबुबकरने आक्रमक खेळ करत दोन्ही विजयी गोल नोंदवले. तसेच सुनील तळेकर, हबीब अहमदने त्याला सुरेख साथ दिली.
विजेते खेळाडू : गोळाफेक - आर.एस.जायभाय, आर.एस.ठोंबरे, आर.एम.सुरे, एस.पी.बनसोड. भालाफेक - एस.एस.इंगोले, एस.आर.जायभाय, वाय.एम.शेख, उमेश गुंडे. हातोडाफेक - बी.टी.राठोड, राजेंद्र सुरे. 5 हजार मीटर - पी.पी.सुलाने, ए.ए. चौघुले, ए.आर पटेल, किरण राठोड.
800 मीटर - चंद्रकला राठोड, अनुराधा चव्हाण, अरुण रागुडे, रामेश्वर काळे. उंच उडी - ज्योती सोनवणे, वर्षा गादेकर, वसिम शेख, एस.आर.पवार. तिहेरी उडी - अरुण रागुडे, एस.के.फड. रिले 4 बाय 400 मीटर - चंद्रकला राठोड, अनुराधा चव्हाण, आरती गावंडे, सविता जायभाय. पुरुष संघ - अरुण रागुडे, प्रवीण गवई, रामेश्वर धापसे, रामेश्वर काळे.