आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Polish Tennis Player Beats Li Na In Wimbledon 2013

समुद्र किना-यावरील मस्ती या टेनिस परीला ठेवते टवटवीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अडणींचा सामना करीत पुढे कसे जावे हे महिला खेळाडूंकडून शिकावे. पोलंडच्‍या एग्नेस्का रांद्वास्‍काने विंबल्‍डन टुर्नामेंटमध्‍ये असाच कारनामा करून दाखवला आहे. दुखापतग्रस्‍त असतानाही तिने मैदान सोडून न जाण्‍याचा निर्णय घेतला. आपला हा निर्णय सार्थ ठरवताना तिने तो सामना जिंकलाही.

महिला गटातील क्‍वार्टर फायनलमध्‍ये चौथ्‍या क्रमांकाची रांद्वास्‍काने सहाव्‍या क्रमांकाच्‍या चीनच्‍या ली नाला 7-6,4-6,6-2 असा पराभव करून सेमीफायनलमध्‍ये जागा बनवली. शानदार फॉर्मात असलेल्‍या या पोलिशगर्लने पहिला सेट 65 मिनिटांत जिंकला. तर दुसरा सेट 44 मिनिटांत गमावला. तिस-या सेटमध्‍ये तिने शेवटी 54 मिनिटांत आपला विजय नोंदवला.

दुस-या सेटदरम्‍यान रांद्वास्‍का गंभीर जखमी झाली होती. तिच्‍या उजव्‍या पायाच्‍या मांसपेशी ताणल्‍या गेल्‍या होत्‍या. पावसाळयात हे दुखणे बाहेर येणे म्‍हणजे खेळाडूसाठी मोठा धोका असतो. मात्र, रांद्वास्‍काने याकडे दुर्लक्ष करत सामना तर सोडलाच नाही. शिवाय तो आपल्‍या खिशातही घातला.

रांद्वास्‍का एक जिद्दी, मेहनती आणि बिनधास्‍त खेळाडू आहे. टेनिस कोर्टवर घाम गाळणे आणि आपला थकवा पळवण्‍यासाठी समुद्र किना-यावर जायची तिला खूप आवड आहे. आपली बहीण उरूस्‍जेला आणि मैत्रिण कॅरोलिन व्‍होजानियाकीबरोबर ती कायम पार्टीमध्‍ये दिसते.

आम्‍ही तुम्‍हाला या पोलिश टेनिस स्‍टारचे काही मजेचे क्षण दाखवणार आहोत जे तिला टेनिस कोर्टवर टवटवीत ठेवण्‍यास मदत करतात. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या रांद्वास्‍काचे समुद्र किना-यावरील मस्‍तीचे काही क्षण...