Home | Sports | From The Field | pollard hits record 10 sixes against india

पोलार्डच्‍या षटकारांनी धोनी, सिद्वूलाही टाकले मागे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 12, 2011, 07:38 PM IST

आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिध्‍द असलेल्‍या पोलार्डने आपल्‍या लौकिकास साजेशी फलंदाजी करताना 119 धावा केल्‍या. आपल्‍या या खेळीत त्‍याने तब्‍बल 10 गगनचुंबी षटकार लगावले.

 • pollard hits record 10 sixes against india

  चेन्‍नई- चिंदबरम स्‍टेडियममध्‍ये टीम इंडियाने वेस्‍ट इंडीजचा 34 धावांनी जरी पराभव केला असला तरी, एकावेळेस किरॉन पोलार्डच्‍या फलंदाजीने सगळयांचाच श्‍वास रोखला गेला होता. एका बाजूने विंडीजचे फलंदाज मैदानात हजेरी लावून जाण्‍याचे काम करत होते तर दुस-या बाजूने पोलार्ड षटकारांची आतषबाजी करीत होता.
  पहिला विक्रम
  आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिध्‍द असलेल्‍या पोलार्डने आपल्‍या लौकिकास साजेशी फलंदाजी करताना 119 धावा केल्‍या. आपल्‍या या खेळीत त्‍याने तब्‍बल 10 गगनचुंबी षटकार लगावले. भारताविरूध्‍द 10 षटकार मारणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
  दुसरा विक्रम
  त्‍याशिवाय पोलार्डने चिंदबरम स्‍टेडियमवर सर्वाधिक षटकार मारण्‍याचा विक्रमही आपल्‍या नावे केला. त्‍याच्‍यापूर्वी या स्‍टेडियमवर सर्वाधिक षटकार मारण्‍याचा विक्रम जस्टिन कँपच्‍या नावे होता. कँपने अफ्रिका इलेव्‍हन संघाकडून खेळताना अशिया इलेव्‍हन विरूध्‍द सात षटकार लगावले होते. या स्‍टेडियमवर नवज्‍योत सिद्वू , सईद अन्‍वर, महेंद्रसिंह धोनी यांनी पाच षटकार लगावले आहेत.
  जागतिक विक्रम
  षटकारांचा जागतिक विक्रम सध्‍या ऑस्‍ट्रेलियाचा अष्‍टपैलू फलंदाज शेन वॉटसनच्‍या नावे आहे. याचवर्षी त्‍याने बांगलादेशविरूध्‍द खेळताना 15 षटकार लगावले होते. भारतातर्फे सर्वाधिक षटकारांचा विक्रम धोनीच्‍या नावे आहे. त्‍याने एका सामन्‍यात 10 षटकार लगावले होते.Trending