आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DSP ची पत्नी आहे ही लेडी बॉक्सर, आता रिओत भारतीय खेळाडूंना देतेय ट्रेनिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूनम एक अॅनालिस्ट (विश्लेषक) म्हणून भारतीय टीममध्ये सहभागी आहे. - Divya Marathi
पूनम एक अॅनालिस्ट (विश्लेषक) म्हणून भारतीय टीममध्ये सहभागी आहे.
हिसार (हरियाणा)- आपल्या पायाच्या जखमेमुळे ऑलिंपियन बॉक्सर अखिल कुमार यावेळी ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊ शकला नाही. मात्र त्याची पत्नी पूनम बेनीवाल रिओ ऑलिंपिकमध्ये भारतीय बॉक्सरची कामगिरी सुधरावेल. पूनम एक अॅनालिस्ट भारतीय टीममध्ये सहभागी झाली आहे. आता तर इतर देशाच्या स्पर्धकांचे बारकावे व त्रुटी हेरून भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करेल. कोण आहे पूनम आणि कशी निवड झाली तिची भारतीय संघात...

- पूनम बेनीवालचा जन्म हिसारमध्ये 1986 मध्ये झाला. वडील बॉक्सिंग कोच सुबेसिंग बेनीवाल खेळाडूंना बॉक्सिंग शिकवायचे.
- वडिलांसमवेत पूनमने स्टेडियममध्ये जाणे सुरु केले. वडिलांना गुरू बनवत तिने रिंगमध्ये पंच कसे मारायचे ते शिकून घेतले. बॉक्सिंगसोबतच ती शिक्षणही घेत राहिली.
- दहावी एचएयूच्या कॅम्पस स्कूलमध्ये, बारावी सीनियर सेकंडरी मॉडेल स्कूल, जाट कॉलेजमधून बीए तर यानंतर थेट इंग्लंडमधील सेफिल्ड हेलम यूनिवर्सिटीत स्पोर्ट्स बिजनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. ती एनआयएस पटियालाची बेस्ट स्टूडंट राहिली.
- सध्या ती वर्ल्ड बॉक्सिंग असोसिएशनच्या महिला आयोगाची सदस्य आहे तसेच एनआयएस पटियालात कोचिंग देते.
- दोन वर्षापासून भारतीय बॉक्सिंग असोसिएशनसोबत जोडली गेली आहे. पूनमला एक मुलगी आहे.
कर्तृत्त्ववान परिवार-
- पूनम बेनीवालचे पती अखिल कुमार अर्जुन अवॉर्डी व कॉमनवेल्थमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. अखिल कुमार हरियाणा पोलिस दलात डीएसपी पदावर कार्यरत आहे.
- पूनमचे वडिल सुबेसिंग बेनीवाल डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर हिसार व फतेहबादमध्ये कार्यरत आहेत.
- बहिण प्रीति बेनीवाल पाच वेळा बॉक्सिंगमध्ये नॅशनल चॅम्पियन राहिली आहे. ती सध्या हरियाणा पोलिस दलात आहे.
- भाऊ सूरज बेनीवाल लॉन टेनिसमध्ये टॉप 15 भारतीय रॅकिंगमध्ये राहिला आहे.
रिव्यू घेऊन भारतीय खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करणार-
- बॉक्सरच्या कामगिरीची समीक्षा केवळ रिओतच नाही तर यश-अपयशानंतरही परत देशात आल्यानंतरही होणार आहे. जेणेकरून भारतीय बॉक्सरची कामगिरी चांगली व्हावी व तांत्रिक चुका टाळण्यसाठी पूनम काम करेल.
- भारतात परतल्यावर प्रत्येक खेळाडूचे प्लस पाँईंट व निगेटिव्ह पाँईंट यानुसार खेळात सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन करेल.
- भारतीय बॉक्सरच्या कामगिरीचा रिपोर्ट भारतीय खेळ विभागला ती देईल. तसेच सरकार त्या आधारावर पुढील कार्यवाही करेल.
- पूनम बेनीवाल व्हिडियो रिकॉर्डिंग पाहून दुल-या देशातील खेळाडूंचे कच्चे दुवे हेरून आपल्या खेळाडूंनी नेमके पंच कसे मारावेत हे शिकवेल.
- विदेशी खेळाडूंचा रिंगमधील वावर, पंच मारण्याची पद्धत, त्याची गती, वेग, पायाची हालचाल व गती, बचावाच्या पद्धती, इतर शरीराची हालचाल आदी हालचाली ते टिपेल.
- ही माहिती भारतीय खेळाडूंच्या कोचसोबत शेअर करून भारतीय खेळाडूंना मानसिकदृष्ट्या मजबूत करण्याचे काम पूनमवर असेल.
- यामुळे खेळाडूंचा आणि कोच यांचा वेळ वाचेल व सराव सलगपणे करता येईल.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पूनमचे निवडक फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...