आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Poor Economic Condition Of Zimbabwe Cricket Board

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झिम्बाब्वेच्या खेळाडूंवर पराजयासह गरीबीचीही नामुष्की, जेवणासाठीही नाहीत पैसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झिम्बाब्वेचा क्रिकेट संघ भारताविरुद्ध झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यातही पराजीत झाला आहे. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिका ४-० ने खिशात घातली आहे. क्रिकेटच्या मैदानावर झिम्बाब्वेच्या संघाची जशी दयनिय अवस्था झाली आहे, मैदानाबाहेरील वास्तव त्यापेक्षाही जास्त भयावह आहे. झिम्बाब्वे क्रिकेट नियामक मंडळाची आर्थिक स्थिती एवढी वाईट आहे, की त्यांच्याजवळ खेळाडूंना हॉटेलमध्ये जेवण देण्यासाठीही पुरेसे पैसे नाहीत.

झिम्बाब्वे क्रिकेट नियामक मंडळाची स्थिती खराब असून त्यात काही सुधारणा होण्याची शक्यता नाही, असे झिम्बाब्वेचे माजी ओपनर आणि फलंदाजीचे प्रशिक्षक ग्रांट फ्लावर यांनी सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे, की आम्ही संघर्ष करीत आहोत. आम्ही कधी या परिस्थितीतून बाहेर येऊ, याची काही कल्पना नाही. नियामक मंडळ मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहे. जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर येथील क्रिकेटची ओळख नष्ट होईल.

अधिक माहितीसाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा