आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Portugal Open Tennis News In Marathi, Sania Mirza, Divya Marathi

पोर्तुगाल ओपन टेनिस :सानिया-कारा ब्लॅकने पटकावले विजेतेपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओइरास - भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाने आपली सहकारी कारा ब्लॅकसोबत पोर्तुगाल ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचा किताब पटकावला. या अव्वल मानांकित जोडीने अंतिम सामन्यात इव्हा हाडिनोव्हा आणि व्हॅलेरिया सोलोव्हेयाला पराभूत केले. सानिया-काराने 6-4, 6-3 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. यासह या जोडीने अवघ्या 78 मिनिटांत विजेतेपदावर नाव कोरले.

सानिया-काराने ही शानदार कामगिरी करताना यंदा सत्रातील पहिल्या किताबावर नाव कोरले. या सत्रात आतापर्यंत सानिया-काराने दोन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, या जोडीला इंडियाना वेल्स व स्टुटगार्ट ओपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

विजेत्यांचा 9 हजार युरो देऊन गौरव
या वेळी विजेत्या सानिया-कारा जोडीचा 9,919 युरो रकमेसह अजिंक्यपद देऊन गौरव करण्यात आला. या विजेतेपदासह सानिया-कारा अव्वल मानांकित जोडीने क्रमवारीत 280 गुणांची कमाई केली.