आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Portugal's Ronaldo Wants To End Career In Madrid ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रिस्टियानो रोनाल्डो उत्सुक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिस्बन - देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोतरुगालची ‘गोल मशीन’ क्रिस्टियानो रोनाल्डो उत्सुक आहे. जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू म्हणून त्याची ओळख आहे.
फुटबॉल विश्वातील स्टार स्ट्रायकर्समध्ये 27 वर्षीय रोनाल्डोच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. पोलंड व युक्रेन येथे 8 जूनपासून 14 व्या युरो चषकाला सुरुवात होत आहे. रियल माद्रिदचा रोनाल्डोच्या पायातील जादु, वेगवान व उत्तुंग शॉट हे युरो चषकात चर्चेचा विषय ठरू शकतात. बार्सलिोनाचा स्टार लियोनेल मेसीप्रमाणे रोनाल्डोला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र युरो चषकात चांगली कामगिरी करण्याची संधी आहे.
रोनाल्डोने 2008 मध्ये फिफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला होता. त्याच्या नावावर दोन युरोपियन ‘गोल्डन बुट’ पटकावल्याची नोंद आहे. त्याने 2010 व 2011 च्या सत्रात 40 गोल केले होते. यंदाच्या मोसमात त्याने ही संघ 46 वर नेली आहे. तो पोतरुगलचा सर्वाधिक गोल करणारा अव्वल खेळाडू ठरला. रोनाल्डो सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याला संघातील खेळाडूंची चांगली साथ मिळाली तर, विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.