आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लान्स आर्मस्ट्राँगविरुद्ध कायदेशीर कारवाई?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- डोपिंग केल्याचे सार्वजनिकरीत्या कबूल केल्यानंतर सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगविरुद्ध अमेरिकन प्रशासनाकडून कायदेशीर कारवाईची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार ओप्रा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीत आर्मस्ट्राँगने प्रतिबंधित औषधी घेतल्याचे कबूल केले.

मागच्या वर्षी टूर द फ्रान्सची सातही विजेतेपदे गमावल्यानंतर आर्मस्ट्राँगची ही पहिली मुलाखत ठरली. ही मुलाखत गुरुवारी प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत त्याने डोपिंगचे आरोप फेटाळले होते. अमेरिकेतील डोपिंगविरोधी संस्थेच्या 1000 पानी अहवालानंतरसुद्धा त्याने गुन्हा कबूल केला नव्हता.