आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prarathana Thombre Played With World No 1 Sania Mirza

नंबर-१ साेबत खेळण्याचा मान प्रार्थना ठोंबरेला, निर्णायक लढतीत भारताचा विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - जागतिक क्रमवारीत नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर सानियासाेबत पहिल्यांदा काेर्टवर खेळण्याचा बहुमान महाराष्ट्राच्या युवा खेळाडूने पटकावला. यासाठी अाशियाई चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेती प्रार्थना ठाेंबरे भाग्यशाली खेळाडू ठरली. तिने शनिवारी जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सानियासाेबत दुहेरीचा सामना जिंकला. फेड चषक टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या सामन्यात सानिया-प्रार्थनाने विजय संपादन केला.

गत अाठवड्यात फॅमिली सर्कल टेनिस स्पर्धा जिंकून सानिया मिर्झाने जागतिक क्रमवारीत दुहेरीचे अव्वल स्थान गाठले. मार्टिना हिंगिससाेबत तिने विजेतेपद पटकावले. तसेच तिने महिला दुहेरीच्या क्रमवारीत दैदिप्यमान अशी प्रगतीदेखील साधली अाहे.

सुवर्णसंधीची चमक
सानियासाेबत खेळावे, असे साेलापूरची युवा खेळाडू प्रार्थना ठाेंबरेचे स्वप्न हाेते. प्रचंड मेहनत अाणि अात्मविश्वासाच्या बळावर तिने ही स्वप्नपूर्ती केली. तिला तिस-यांदा सानियासाेबत खेळण्याची संधी मिळाली. अाशियाई स्पर्धेत तिने सानियासाेबत महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले. याशिवाय तिने अाता जगातील नंबर वन झालेल्या सानियासाेबत पहिल्यांदा खेळण्याचा बहुमानही पटकावला. यासाठी केलेल्या मेहनतीचे तिला फळ मिळाले.

विजयी माेहिमेची ‘प्रार्थना’ फळाला
नंबर वनच्या सिंंहासनावर विराजमान झाल्यानंतर सानियाने अापल्या सत्रातील माेहिमेला सुरुवात केली. या वेळी तिने प्रार्थनासाेबत अापल्या विजयाची माेहीम फत्ते केली. याशिवाय तिने सलग विजयाची लयदेखील कायम ठेवली. सानियाने शनिवारी अाशिया-अाेशियाना ग्रुप-२ च्या फेड चषकात प्रार्थनासाेबत दुहेरीचा सामना जिंकला. नंबर वन झाल्यानंतरचा सानियाचा हा पहिला विजय ठरला.

याेग्य समन्वयाने विजय
^फेड चषकात अाम्ही एकेरीचा सामना गमावला. त्यामुळे दुहेरीच्या निर्णायक सामन्यात अाम्हाला विजयाची गरज हाेती. या वेळी सानियासाेबत मी याेग्य प्रकारे समन्वय ठेवला अाणि सामन्यात शानदार विजयाची नाेंद केली. यासह भारताला फिलिपाइन्सविरुद्ध विजय मिळवून दिला, असे प्रार्थना म्हणाली.