आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेस, बोपन्नासाेबत खेळण्यास उत्सुक, प्रार्थनाची माहिती; फेड चषकात देदीप्यमान यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भारताची अव्वल मानांकित सानिया मिर्झापर्यंत पोहोचण्याचे ध्येय ठेवून मी माझ्या टेनिसच्या कारकीर्दीस सुरुवात केली. तिच्याबरोबर दुहेरीत खेळण्याचा मान मिळाल्यानंतर मिश्र दुहेरी लिएंडर पेस अथवा रोहन बोपन्नाबरोबर खेळायला मला आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली ती बार्शीची व भारताची द्वितीय मानांकित प्रार्थना ठोंबरे हिने.

फेड कप स्पर्धा खेळून आल्यानंतर बार्शीस रवाना होण्यापूर्वी आयोजित वार्तालपात तिने ही इच्छा व्यक्त केली. ‘अॉलिम्पिकमध्ये प्रवेश मिळण्यासाठी एकेरीचे ३०० व दुहेरीचे मानांकन १०० च्या आत येणे गरजेचे आहे. आपण ताकदीत कमी पडतो, परंतु टेक्निकमध्ये कमी पडत नाही. सानियाबरोबर खेळत असल्यामुळे तिच्याच मार्गदर्शनाखाली एक वर्षापासून माझा सराव सुरू आहे. तसेच सानियाबरोबर दुहेरीत खेळायला संधी मिळत आहे. आता माझे पुढील लक्ष्य िरयाे अॉलिम्पिकम स्पर्धा व कॉमनवेल्थ गेम, असेही या वेळी प्रार्थनाने नमूद केले.
जाहीर बक्षिसासाठी प्रयत्न : पालकमंत्री
आशियाई स्पर्धेत ब्रॉंझ मिळाल्यानंतर २३ लाख व त्याअगोदर जाहीर झालेली ६ लाख अशी २६ लाखांची राज्य शासनाकडून जाहीर झालेली रक्कम मिळण्याचा पाठपुरावा करणार असे पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले.