आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Praveen Kumar Unfit For Playing The Game : Demand To Bcci Take Action

मानसिकदृष्ट्या प्रवीणकुमार खेळण्यासाठी अनफिट :बीसीसीआयकडे करवाईची मागणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रागीट स्वभावासाठी चर्चेत असलेला वेगवान गोलंदाज प्रवीणकुमारची क्रिकेट कारकीर्द धोक्यात आली आहे. विरोधी खेळाडूंसोबत भांडण, शिवीगाळ आणि पंचांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्याचा गंभीर आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. तो लेव्हल 2 आणि लेव्हल 4 नुसार दोषी आढळला आहे. सामनाधिकारी धनंजय के. सिंग यांनी बीसीसीआयकडे कठोर करवाईची मागणी केली असून प्रवीणकुमार क्रिकेट खेळण्यासाठी मानसिकरीत्या अनफिट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टीम इंडियाकडून प्रवीणने 68 वनडेत 77 विकेट आणि 6 कसोटीत 27 गडी बाद केले आहेत. त्याने स्वत: स्टारडमची काळजी घेतली नाही. 4 फेब्रुवारी रोजी कॉर्पोरेट चषक क्रिकेट स्पर्धेत ओएनजीसी आणि इन्कम टॅक्स यांच्यात भिलाई येथे सामना झाला. या सामन्यात ही घटना घडली. प्रवीण ओएनजीसीकडून खेळत होता. सामन्याच्या 48 व्या षटकात त्याने इन्कम टॅक्सचा फलंदाज अजित अर्गलला अभद्र इशारे केले आणि शिवीगाळसुद्धा केली. वाद वाढू नये म्हणून समजावण्यास आलेले पंच कमलेश शर्मा आणि अजित एस. दातार यांच्यासोबतसुद्धा प्रवीणने शिवीगाळ केली. पंचांनी अखेर त्याला कोड आॅफ कंटक्टची धमकी दिली तरीही प्रवीणने ऐकले नाही. पंचांनी सामनाधिका-या कडे लेखी तक्रार केली. धनंजयसिंग यांनी सविस्तर माहिती बीसीसीआयकडे पाठवली आहे.

डोक्याने अर्गलला दिली धडक
आपल्या षटकात एक चेंडू टाकल्यानंतर प्रवीण फलंदाजाकडे आला. त्याला डोक्याने धडक दिली. सोबत त्याने शिवीगाळही केली, असे सामनाधिका-या ने पत्रात लिहिले आहे.

आता काय होऊ शकते ?
सामनाधिका-या ने शंभर टक्के सामनेनिधीत कपात व ताकीद देण्याची सूचना केली आहे.
काही वर्षांसाठी बंदी लागू शकते.
सहकारी दूर पळतात

‘प्रवीणच्या भांडणानंतर आणि त्याच्या या सवयीमुळे संघातील त्याचे सहकारी त्याच्यापासून दूर पळतात. अंतर ठेवणेच पसंत करतात.’ अजित दातार, पंच.

यापूर्वीसुद्धा केल्या आहेत भानगडी
फेब्रुवारीत रायपूर येथे कॉर्पोरेट चषकात ओएनजीसी-कॅग यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी डिवचल्यानंतर प्रेक्षागृहाजवळ प्रवीणने त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. कसेबसे प्रवीणला शांत करण्यात आले होते.
काही वर्षांपूर्वी चंदिगड येथे मोहंमद कैफचा फोटो काढल्यानंतर प्रवीणने एका पत्रकाराचा कॅमेरा हिसकावला होता. नंतर कैफने प्रवीणच्या पराक्रमावर मीडियाकडे माफी मागितली होती.

‘होय, मी असे केले आहे. असे होतच असते. क्रिकेटमध्ये ही काही फार मोठी गोष्ट नाही.’
प्रवीणकुमार.