Home »Sports »Latest News» Praveen Suspended By BCCI

बीसीसीआयने प्रवीणकुमारला केले निलंबित

वृत्तसंस्‍था | Feb 10, 2013, 17:03 PM IST

  • बीसीसीआयने प्रवीणकुमारला केले निलंबित

नवी दिल्‍ली- मध्‍यमगती गोलंदाज प्रवीणकुमारला आगामी विजय हजारे आंतरराज्‍य स्‍पर्धेतून निलंबित करण्‍यात आले आहे. मागील आठवडयात कॉर्पोरेट चषकात प्रवीणकुमारने खेळाडूंना उद्देशून अपशब्‍द आणि पंचांशी गैरवर्तन केल्‍याबद्दल बीसीसीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

'प्रवीणकुमारला क्रिकेट मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्‍याला आगामी विजय हजारे चषकातून निलंबित करण्‍यात आल्‍याचे बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

विजय हजारे चषकासाठी प्रवीणचा उत्तर प्रदेश संघाच्‍या 15 जणांच्‍या टीममध्‍ये समावेश करण्‍यात आला होता. शनिवारी बीसीसीआयने त्‍याला कॉर्पोरेट चषकात मागील आठवडयात ओनजीसी संघाकडून खेळतेवेळी झालेल्‍या घटनेविषयी बाजू मांडण्‍यास सांगितले होते.

प्रवीणने प्राप्‍तीकर संघाचा फलंदाज अजित अर्लगलाला शॉर्ट पिच चेंडू टाकला होता. या चेंडूविरोधात फलंदाजाने नो बॉल विषयी पंचाकडे विचारणा केली होती. यावेळी प्रवीणकुमारने त्‍याला अपशब्‍द वापरले होते. इतक्‍यावरच तो न थांबता त्‍याने मैदानावरील पंच अजित दातार आणि कमलेश सिंग यांना उद्देशून अपशब्‍द वापरले. नंतर पंचांनी सामनाधिकारी धनंजय सिंग यांच्‍याकडे याविषयी तक्रार केली होती. सामनाधिका-यांनी प्रवीणकुमारला 'मानसिक दृष्‍टया अपात्र' खेळाडू ठरवले होते. त्‍यांनी तसा अहवालही बीसीसीआयला सोपवला होता.

Next Article

Recommended